बीडशेड (ता. करवीर) येथे कसबा बीड, सावरवाडी, गणेशवाडी, धोंडेवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दु., बहिरेश्वर आदी गावातील सरपंच, उपसरपंच कोरोना दक्षता समिती, दूध संस्था पदाधिकाऱ्यांच्या कोरोना उपाययोजना बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सत्यजित पाटील होते.
शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा कोरोना संसर्गजन्य बळावत आहे. त्या अनुषंगाने गावातील असणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अलगीकरण करणे, त्यांच्या घरातील व्यक्तींना होम क्वारंटाइन करणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर गावातील अत्यावश्यक दुकानांमध्ये गर्दी न करता शासन स्तरावरून मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स पाळणे अशा नियमांचे पालन करावे. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे, त्या गावांमध्ये कडक लॉकडाऊन करणे इत्यादी प्रमुख मुद्यांवर व्यापक चर्चा करण्यात आली.
बैठकीला कसबा बीडचे सरपंच सर्जेराव तिबिले, माजी सरपंच सत्यजित पाटील, करवीर पंचायत सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पोलीस पाटील पंढरीनाथ तहसीलदार, गणेशवाडीचे सरपंच दादासोा लाड, पोलीस पाटील धनश्री मेढे, शिरोली दुमालाच्या सरपंच रेखा कांबळे, बहिरेश्वर पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, ग्रामसेवक राजाराम पाटील, विमल शेट्टी, संदीप पाटील, बी. एस. कांबळे उपस्थित होते.
फोटो : १० बीडशेड बैठक
बीडशेड (ता. करवीर) येथे कोरोना उपाययोजना बैठकीत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच दादासोा लाड, सर्जेराव तिबिले, माजी सरपंच सत्यजित पाटील व करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी उपस्थितीत होते.