शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कोल्हापूरात सामुदायिक शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 4:29 PM

कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली.

ठळक मुद्देमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणीशिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात सामुदायिक शपथ

कोल्हापूर : कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली.मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर शिवशाहीर राजू राऊत यांनी उपस्थितांना शपथ दिली.  

याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शरद सामंत, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, दुर्गेश लिंग्रज, राजेंद्र जाधव, दिनेश परमार, धनाजी यादव, रणजित आयरेकर, योगेश शिंदे, प्रतीक क्षीरसागर, राजेंद्र पाटील, चंद्रकांत भोसले, आदी उपस्थित होते.अशी घेतली शपथमाझी मातृभाषा मराठी या भाषेचा सन्मान, या भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, जागतिक स्तरावर या भाषेचा विचार व्हावा; यासाठी मी शपथबद्ध आहे. मी रोजच्या व्यवहारात, कुटुंब-समाज, कार्यालय, सार्वजनिक संस्था येथे मराठी भाषेतूनच संवाद करेन, तसेच मराठी भाषेतून शासकीय, निमशासकीय कार्य होण्यासाठी आग्रही असेन. या भाषेतील पुस्तके, नाटके, चित्रपट, आदी कार्यक्रमांना माझे प्राधान्य असेल.

परभाषेच्या आक्रमणापासून मराठी वाचविण्यासाठी, पुढील पिढीला या भाषेचा गोडवा, समृद्धी व महत्त्व पटवून देईन. संगणकावरही मराठी टंकलेखनाचा आग्रह मी धरेन. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या भाषेच्या प्रवाहीपणासाठी ही अभिजात भाषा राहावी, ही माझी मनाची इच्छा आहे. मराठी भाषेचा भविष्यातील गौरव, सन्मान हे माझे ध्येय आहे.

 शिवसेनेच्या वतीने सोमवारी बिंदू चौकात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी सामुदायिक शपथ घेण्यात आली.

 

टॅग्स :marathiमराठीkolhapurकोल्हापूर