इचलकरंजी : कोल्हापूर विभागीय नियामक मंडळ व येथील डीकेटीई यांच्यावतीने आयसीएसआयच्या सी.एस. अभ्यासक्रमाचे स्टडी सेंटर संस्थेच्या इंग्लिश मीडियम हायस्कूल-कॉलेजमध्ये सुरू करण्यात आले आहे. या स्टडी सेंटरचा प्रारंभ अमित पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. सी.एस. स्टडी सेंटरच्या माध्यमातून सीएसइइटी, सीएस एक्झिक्युटिव्ह, सीएस प्रोफेशनल या परीक्षांच्या रजिस्ट्रेशनसह अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. सीएसइइटीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कमीत कमी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या स्टडी सेंटरच्या माध्यमातून माफक फीमध्ये नामवंत शिक्षक व सी.एस. असणाऱ्या व्यक्तींकडून शिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमास मानद सचिव डॉ. सपना आवाडे, जोतिबा गावडे, अमृतलाल पारख, प्रवीण निंगनुरे, प्राचार्या माला सूद, विजय चौगुले, राजश्री लंबे, रिया कारेकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
फोटो ओळी
१८०७२०२१-आयसीएच-०१ डीकेटीईमध्ये कंपनी सेक्रेटरी स्टडी सेंटरचा प्रारंभ अमित पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.