सांगरूळ (ता. करवीर) येथे राजर्षी छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरूळ हायस्कूलचे माजी प्राचार्य जी. पी. नाळे होते.
यावेळी सत्कारमूर्ती सरदार नाळे यांनी पालकांनी आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षातून यशस्वी होण्यासाठी पाठबळ द्यावे. युवकांनीही अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने सातत्याने प्रयत्न करावेत. निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामपंचायतीने युवकांना स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठीची साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी आपणही सहकार्य करू, अशी ग्वाही सरदार नाळे यांनी दिली.
यावेळी भीमराव नाळे ,बी आर नाळे, आर. जी. नाळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसरपंच एस. एम. नाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पांडुरंग सोसायटीचे संचालक आनंदराव नाळे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, माजी सरपंच आनंदराव नाळे, तुकाराम नाळे, बी. आर. नाळे, राजाराम नाळे, संभाजी नाळे, सर्जेराव नाळे, सचिन नाळे, प्रदीप नाळे, विलास नाळे, पै. गणपती नाळे, दत्तात्रय नाळे, विश्वास नाळे, बळिराम नाळे यांच्यासह शाहू नाळे तालीम मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.