शेखर धोंगडे ।कोल्हापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत 'स्वच्छता अॅप' डाऊनलोड करण्यात कोल्हापूर शहर देशातील अन्य शहरांच्या तुलनेने अत्यंत मागे असून, देशात आजच्या स्थितीला 192 व्या स्थानावर आहे. आज स्थितीला संपूर्ण शहरातून केवळ एक हजार १७० नागरिकांनी हे स्वच्छता अॅप डाऊन लोड केले असून, यावर १३६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
हे अॅप अधिकाधिक नागरिक, युवकांनी डाऊनलोड करून त्यावर तक्रारी देऊन शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा यासाठी अधिकारी, कर्मचारी यांचे जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.२ आॅक्टोबर २०१४ ला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. या मोहिमेत केवळ सरकारी कमचाºयांवर भर न देता समाजाच्या सर्वच स्तरांतील नागरिकांनी भर द्यावा, म्हणून जनजागृती करण्यात आली.
नागरिकांनी केलेल्या तक्रारी, सूचना यांची तातडीने दखल घेऊन त्या सुधारल्या पाहिजेत. स्वच्छता अभियानाबरोबरच अन्य सुविधा नागरिकांना मागणीनुसार मिळाल्या पाहिजेत, तसेच थेट प्रशासनाशी घरबसल्या समन्वय साधता यावा हा या ‘स्वच्छता अॅप’चा मुख्य उद्देश आहे.परंतु, कोल्हापूर शहरातील जनतेकडून याला आवश्यक असा प्रतिसाद मिळत नसल्याने अन्य शहरांच्या तुलनेत आपले शहर मागेच आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेपुढे जनजागृतीचे आव्हान असून, प्रशासनाने आता नागरिकांनीही हे अॅप डाऊनलोड करून घेण्यासाठी कंबर कसली असून, दररोज चौकाचौकांत, प्रभागात थांबून कॉलेज, संस्था येथे या ‘स्वच्छता अॅप’ची माहिती देणे व ते डाऊनलोडसाठी सूचना देत आहेत.स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून ‘स्वच्छता अॅप’ची निर्मिती केली आहे.२४ तासांत होणार निराकरणपरिसरातील कचरा, तुंबलेली गटारे, भरलेल्या कचरा कुंड्या, अस्वच्छ परिसर, अशुद्ध पाणी, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था यांचे फोटो काढून ते 'स्वच्छता अॅप'वर टाकल्यास त्यांची दखल घेऊन महापालिका प्रशासन १२ ते २४ तासांत त्यावर उपाययोजना करून पुन्हा त्याचे उत्तर अॅपवर दिले जात आहे.कोल्हापूर महापालिका देशात १९२ क्रमांकावरनागरिकांनी हे ‘स्वच्छता अॅप’ डाऊन लोड करून त्यावर परिसरातील तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.महाविद्यालय, हॉस्पिटल, संस्था, हॉटेल येथे अधिकारी, कर्मचारी या अॅपविषयी माहिती देत, शहर स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याविषयी जनजागृती करीत असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.शहरातून एकूण २ हजार ३९० तक्रारी अॅपवर दाखल.नोव्हेंबर महिन्यात ३२ तक्रारी दाखल असून त्यातील २८ तक्रारींचे निराकारण झाले असून ४ कामांची पूर्तता सुरु आहे.स्वच्छतेविषयक कामगिरीचा दर्जा, कौन्सिल आॅफ इंडिया संस्थेद्वारे सर्वेक्षण होते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशातील ४ हजार ४१ शहरे सहभागी आहेत. स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत.