कोल्हापूर : लाच -लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. त्याचा पाठपुरावा विभागामार्फत केला जाईल त्यामुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले.सतर्क भारत, समृध्द भारतह्ण ही संकल्पना घेवून केंद्रीय दक्षता आयोगातर्फे दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने पोलीस उप अधीक्षक बुधवंत म्हणाले, या सप्ताहाच्या निमित्ताने आठवडी बाजाराच्या ठिकाणी माहिती पत्रकाच्या आधारे जनजागृती करण्यात येणार आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून आपले काम होणार नाही, अशी कोणतीही भीती नागरिकांनी बाळगू नये. त्यांचे शासकीय काम नियमानुसार होत असेल तर ते करून देण्याची जबाबदारी लाच लुचपत विभागाची आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शासकीय काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी, लोकसेवक लाच मागणी करत असेल तर नागरिकांनी निर्धास्तपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 7083668333, 9011228333, 0231-2540989 आणि 7875333333 या व्हॉट्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही बुधवंत यांनी केले आहे.
लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे तक्रार करा : आदिनाथ बुधवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:58 PM
bribecase, collcator, kolhapurnews लाच -लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. त्याचा पाठपुरावा विभागामार्फत केला जाईल त्यामुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले.
ठळक मुद्देलाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे तक्रार करा : आदिनाथ बुधवंततक्रारदाराच्या शासकीय कामाचा पाठपुरावा करू -पोलीस उप अधीक्षक