कोल्हापूर : आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी किंवा नवीन आधारकार्ड काढण्यासाठी शासन स्तरावरून दर निश्चित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जर कोणी आॅपरेटर जादा पैसे घेत असतील, तर त्यांच्याविरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी केले.
शासनाने नवीन आधारकार्ड काढणे व अद्ययावतीकरण करण्यासाठी दरनिश्चिती केली आहे. त्यानुसार नवीन आधार कार्ड काढणे व पाच ते १५ वयोगटातील बायोमॅट्रिक अद्ययावतीकरण करणे, हे नि:शुल्क असणार आहे. इतर बायोमॅट्रिक अद्ययावतीकरण करण्यासाठी २५ रुपये, आधार क्रमांक शोधणे व प्रिंट देणे १ (ब्लॅक अॅँड व्हाईट) १० रुपये व कलर प्रिंट २० रुपये, असे दर ठरविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कोणताही आॅपरेटर आपल्याकडून जादा पैशांची मागणी करत असल्यास संबंधितांनी या कार्यालयाकडे लेखी किंवा या ङ्मे ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.