शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:17 AM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, आता आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सक्तीने दंड भरून घेतला जाणार आहे. कोणाचाही वशिला चालणार नाही, शिफारस केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

ठळक मुद्देवाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुखसावधान, ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली : अत्याधुनिक ५५ मशीन दाखल

कोल्हापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, आता आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सक्तीने दंड भरून घेतला जाणार आहे. कोणाचाही वशिला चालणार नाही, शिफारस केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

ए टी एम किंवा डेबिट कार्ड जागेवर स्क्रॅच करून दंड वसूल केला जाणार आहे; त्यासाठी पोलीस दलात ५५ अत्याधुनिक मशीन दाखल झाले आहेत. दंडाची पावती वाहनधारकाला जागेवर मिळणार आहे. बदलत्या काळानुसार ‘एक राज्य एक ई चालान’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी  दिली.मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलप्रमाणे दिसणाऱ्या ‘ई’ चलन मशीनचा लॉग इन आयडी व पासवर्ड ठरलेला आहे. यामध्ये कॅमेऱ्यांसह ‘ए टी एम व डेबिट कार्ड स्विप करण्याची सोय आहे. सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी सेवा बजावताना एखादा वाहनचालक मोबाईलवर बोलत असणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढतील. त्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसेल.

ही रक्कम वाहनधारकाने ए टी एम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरायची आहे. एखादा वाहनचालक दंड भरण्यास नकार देत राजकीय ओळख दाखवून शिफारस करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळणार आहे.

एखाद्या वाहनधारकास दंड भरण्यास पुरेसे पैसे नसतील, तर नंतर तो घरी जाऊन राज्यात कोठूनही आॅनलाईनद्वारे दंड भरूशकतो, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते.यांना दिली मशीन

  1. शहर वाहतूक शाखा : ३०
  2. इचलकरंजी वाहतूक शाखा : १०
  3. जुना राजवाडा पोलीस ठाणे : १
  4. लक्ष्मीपुरी : १
  5. राजारामपुरी : १
  6. शाहूपुरी : १
  7. गांधीनगर : २
  8. एमआयडीसी : २
  9. गोकुळ शिरगाव : १
  10. करवीर : २
  11. जयसिंगपूर : २
  12. वडगाव : २

 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर