करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये असणाऱ्या नगर भूमापन विभागाचे कार्यालयात नागरिकांची कामेच होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच प्रत्येक गुरुवारी या कार्यालयात हजर राहात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे ठरवले आहे. या ठिकाणाहून कोतोली, कळे, बाजारभोगाव परिसरातील दीडशेहून अधिक गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणापेक्षा हे ठिकाण सोयीचे असल्याने अनेकांना याचा वाहतुकीच्या दृष्टीने फायदा होतो. परंतु, काही महिन्यांपासून या कार्यालयातून नागरिकांना न्याय मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन पन्हाळा भूमी अभिलेखचे उपअधिक्षक सुनील लाळे यांनी दर गुरूवारी कार्यालयात येऊन नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोतोलीत भूमापन कार्यालयात होणार तक्रारींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:24 AM