कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, लोकांचे आरोग्य सुधारावे आणि प्रदूषण कमी करण्यात हातभार लावावा या हेतूने कोल्हापूर बायसिकल क्लबने सुरू केलेल्या उपक्रमाने आता मूळ धरले असून या संस्थेच्या ७० सदस्यांनी नुकतेच ७५ किलोमीटर अंतर सायकलवरून पूर्ण केले.
कोल्हापूर बायसिकल क्लब ही कोल्हापुरातील सायकलप्रेमींनी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेत लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सहभागी आहेत. गेल्या आठवड्यात या संस्थेतील १२ ते ६६ वयोगटातील ७ सायकलपटूंनी कोल्हापूर ते तुळशी डॅम अशी ७५ किलोमीटरची सायकल रॅली पूर्ण केली. या मोहिमेचे गिरीश बारस्कर, अर्जुन पाटील, राजेश बाभुळकर, सचिन पाटील, राजीव जामसांडेकर, अनिल शिंदे, समीर नागटिळक आदींनी आयोजन केले होते.
कोल्हापूरकरांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, त्या योगे प्रदूषण कमी करण्यात हातभार लावावा आणि लोकांचे आरोग्य सुधारावे असा कोल्हापूर बायसिकल क्लबचा हेतू आहे. या प्रयत्नांमुळे कोल्हापूर पुन्हा एकदा हरित शहर म्हणून ओळखले जावे, अशी इच्छा असल्याचे मत संस्थेतील सदस्यांनी व्यक्त केले आहे.
------------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
फोटो : 31082021-kol-kolhapur bicycale ride
फोटो ओळी : कोल्हापूर बायसिकल क्लबच्या ७० सदस्यांनी कोल्हापूर ते तुळशी डॅम हे अंतर पूर्ण केल्यानंतर रंकाळा येथे जल्लोष केला.
310821\31kol_3_31082021_5.jpg
31082021-kol-kolhapur bicycale ride