शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय थांबणार नाही

By admin | Published: April 27, 2017 12:08 AM

संघर्ष यात्रा : कासेगावातील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

इस्लामपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही, ही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भूमिका निषेधार्ह आहे. फडणवीस सरकारच्या काळातील सात अधिवेशनांत आम्ही सर्व विरोधी पक्षांचे आमदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, त्यांचा सात-बारा कोरा करा आणि शेती उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. तरीही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून घेतल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काढलेल्या तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे बुधवारी इस्लामपुरात आगमन झाले. त्यानंतर कासेगाव (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील यांच्या ‘पदयात्री’ स्मारकासमोरील पटांगणात रात्री जाहीर सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादीचे आमदार अबू आझमी, आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार जितेंंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, आमदार सुमनताई पाटील, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांचे आमदार रणरणत्या उन्हात राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख घेऊन राज्यभरात संघर्ष करीत आहेत. शेतकऱ्याला त्याच्या कर्जातून मुक्त करताना, सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मोदी-फडणवीस यांनी निवडणुकीत मते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वाटेल ती आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पूर्ण न करता केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवीत आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपने कर्जमाफी दिली; मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी फडणवीस सरकार चालढकल करीत आहे, ही निषेधार्ह बाब आहे. ते म्हणाले की, शेतकरी असंघटित असल्याचा गैरफायदा ) भाजप सरकार उठवत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून भाजपचे नेते अकलेचे तारे तोडत आहेत. राज्यातील तूर उत्पादकांची सरकार थट्टा क रीत आहे. लाखो क्विंटल तूर रस्त्यावर पडून आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. अजित पवार म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुटप्पी राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात लोकशाही आहे, ठोकशाही, हिटलरशाही नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या भूमीत हे चालणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास मानवी विकास निर्देशांक कमी होईल, असे सांगत भाजप नेत्यांसह रिझर्व्ह बॅँक, स्टेट बॅँकेचे अधिकारी व देशाचे आर्थिक सल्लागार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीएवेजी यापुढे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आयकर लावण्याचे षड्यंत्र नीती आयोगाकडून रचले जात आहे. देशाच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात जी वेळ आली नव्हती, तेवढी वाईट वेळ पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांवर आणली आहे. तामिळनाडूचे शेतकरी टोकाच्या आंदोलनाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पडेल ती किं मत मोजून हा संघर्ष करीतच राहणार आहे. कर्जमाफी न दिल्यास लाखो शेतकऱ्यांना घेऊन सचिवालयाला घेराव घालण्याचा इशार सुनील तटकरे यांनी दिला. ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात केवळ अडीच वर्षात नऊ ते दहा हजार शेतकरी आत्महत्या करतात, ही दुर्दैवी बाब आहे. त्याला कें द्र व राज्य सरकारचे शेतकरीविरोधी धोरण कारणीभूत आहे. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरण होते. कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी देशात दुसरी कृषी क्र ांती केली. शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले. उद्योगपतींची कर्जे माफ करणाऱ्यांना भाजप सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. आमदार प्रकाश गजभिये, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे प्रवीण गायकवाड, आमदार दिलीप सोपल यांचीही भाषणे झाली. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्वागत केले. आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी आमदार भारत भालके, आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार जयदेव गायकवाड, आमदार ख्वाजा बेग, आमदार डी. एस. आहिरे, आमदार रामहरी रुपनवर, पृथ्वीराज पाटील, जनार्दनकाका पाटील, अरुण लाड, प्रा. शामराव पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)सदाभाऊंवरही टीका : या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वक्त्यांनी भाजप सरकारवर आसूड ओढताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. खोत यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या यात्रेची थट्टा केली,यावरून त्यांचा शेतकरी चळवळीशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काही संबंध उरला नसल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका वक्त्यांनी केली. वसंतदादा-राजारामबापूंची प्रेरणा संघर्ष यात्रेचे बुधवारी जिल्ह्यात आगमन झाल्यावर सकाळी सांगलीत वसंतदादांच्या समाधीचे, तर सायंकाळी इस्लामपूर येथे राजारामबापूंच्या समाधीचे दर्शन घेतले. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांनी या परिसराचे आणि एकूणच महाराष्ट्राचे सामाजिक जीवनमान उंचाविण्यासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ही संघर्ष यात्रा राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहील, अशी ग्वाही सर्व वक्त्यांनी दिली.