कोल्हापूर : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी सुचना खासदार संजय मंडलीक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशासनास केली.पंचगंगा नदीवरील घाट सुशोभिकरणाचं काम गेले वर्षभर बंद आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार मंडलीक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शासकिय विश्रामृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. बैठकिस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता धनंजय भोसले, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते.कोल्हापूर शहर नागरी कृती समिती सदस्यांनी हेरिटेज समितीवर टिकेची झोड उठवत, कोल्हापूरच्या विकासकामात आडकाठी ठरणारी हेरिटेज समितीच बरखास्त करा, अशी मागणी यावेळी केली.पंचगंगा घाट हेरिटेज स्थळांच्या यादीत असणार्या ब्रम्हपुरीपासून शंभर मीटरच्या आत असल्याने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय घाट सुशोभिकरण करता येणार नाही, असा आक्षेप हेरिटेज समितीने घेतला आहे. यावर बैठकीत वादळी चर्चा झाली. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे यासंबंधी काही व्यक्तींनी तक्रार केल्याने पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांच्या तोंडी सुचनेवरून हे काम थांबवण्यात आले अशी माहिती हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली.कृती समितीचे सदस्य अशोक पोवार, रमेश मोरे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, प्रशांत कदम यांच्यासह सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेतला. हेरिटेज समितीकडे काही विघ्नसंतोषी लोक तक्रारी करुन विकासकामात अडथळा आणत आहेत, असा थेट आरोप सदस्यांनी केला. हेरिटेज समितीमधील दोन सदस्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण आणि संवर्धनाचं काम रखडल्याबद्दल बैठकीत सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली.केंद्रीय पुरातत्व विभागानं पंचगंगा घाट संवर्धनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन करणारे पत्र महापालिकेने पाठवले आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दिली. ऐतिहासिक स्थळांंचं संवर्धन संरक्षण करणे केंद्रीय पुरातत्व आणि हेरिटेज समितीचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी नियमांची अंमलबजावणी झालीच पाहीजे हा आपला आग्रह असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
पंचगंगा घाट सुशोभिकरणाची प्रक्रिया चार दिवसात पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 11:27 AM
Panchganga River SanjayMandlik Kolhapur : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी सुचना खासदार संजय मंडलीक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशासनास केली.
ठळक मुद्देपंचगंगा घाट सुशोभिकरणाची प्रक्रिया चार दिवसात पूर्ण करा खासदार मंडलिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना