मलकापूर :
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून लागू केलेल्या संचारबंदीला शाहूवाडी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा देणारी केंद्रे व आस्थापना वगळता अन्य बाजारपेठ बंद होत्या.
शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतादायक होऊ लागली आहे. शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचा फारसा परिणाम तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत जाणवत नव्हता. अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट असणारी दुकाने व आस्थापना सुरू होत्या. वाहनांची वर्दळ नेहमीसारखीच जाणवत होती.
शाहूवाडी पोलीस प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील प्रमुख मार्गांवर गस्त घातली जात होती.
एकूणच शाहूवाडी तालुक्यात संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी यापुढे तरी सतर्क राहून संचारबंदी काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.