जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तहसीलदार दिनेश पारगे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते; परंतु अंशत: लॉकडाऊनलाही नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.
अत्यावश्यक सेवा वगळता
शहरातील इतर व्यवसाय बंद ठेवण्यात होते. किराणा, धान्य विक्रेत्यांची दुकाने दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. भाजीपाला, फळविक्रेत्यांनी नेहमीप्रमाणेच आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. जिल्हा प्रवेशावरील निर्बंध हटविल्यामुळे शहरातील सर्व वाहतूक सुरळीतपणे चालू होती.
शासनाने रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी जाहीर केली आहे; परंतु शहरात सकाळी आणि रात्री १० नंतर फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे संचारबंदीकडेही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
गडकरी महाविद्यालयात
आरोग्य दिन
गडहिंग्लज : येथील ई.बी. गडकरी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.पी. डिसोझा होते. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज डांग, आजरा येथील आयर्वेद तज्ज्ञ डॉ. रोहन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी आरोग्यगीत सादर केले. डांग यांनी ‘कोविड १९ व्यवस्थापन’, जाधव यांनी ‘संमोहन व बौद्धिक क्षमता’ तर डिसोझा यांनी ‘मानसिक आजार व सामान्य मनोविकार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
विशाल चव्हाण व गोपाल माळी यांनी सूत्रसंचालन केले. कविता यादव यांनी आभार मानले.
----
अवंतिका सावंत हिचे एकपात्री स्पर्धेत यश
गडहिंग्लज : येथील राधाकृष्ण पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अवंतिका आनंदा सावंत हिने नाट्यछटा व एकपात्री प्रयोग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक आणि प्रशिक्षण राज्य परिषद, पुणे यांच्यातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती. तिला प्राचार्या वैशाली भिऊंगडे व आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले.