कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांना राज्य शासनाकडून शालेय फीविषयी सूचना देण्यात आलेल्या असतानाही सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल शिरोली या शाळेकडून पालकांवर फी वसुलीसाठी दबाव आणला जात आहे. तरी या शाळेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शाळेकडून सुरक्षारक्षक फी, पेन्सिल, नोटबुक झेरॉक्स, आदर ॲक्टिव्हिटीज, युनिफॉर्म अशा कारणांसाठी पैसे वसूल करण्यात आले आहेत. शाळेचे नाव व शिक्का असलेल्या पावत्या शाळेतच ठेवून त्यावर तारीख सुद्धा टाकलेली नाही. दुसरीकडे पालकांना शाळेचे नाव व शिक्का नसलेली कच्ची पावती दिली जाते. ज्या पालकांना फी भरणे जमले नाही, त्यांना, विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेला बसू न देणे किंवा शाळेतून दाखला काढून घेऊन जावा, असे सांगितले जात आहे. शाळेवर कारवाई न केल्यास पक्षाच्यावतीने जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी दिला आहे.
--