श्री रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा या नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या संस्थेकडून येथील तु. कृ. कोलेकर महाविद्यालयास संगणक व प्रिंटर हे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. नेसरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते. साहित्य संस्थापक व अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते ॲड. हेमंत कोलेकर यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.
प्रारंभी एम. एल. चौगुले यांचा कोलेकर यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. भांबर यांनी केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. डी. के. मायदेव, संचालिका डॉ अर्चना कोलेकर, नेसरी शाखाध्यक्ष आर.बी. पाटील,
कुडाळ शाखा सल्लागार मनोहर गुरबे, प्रा.डॉ. डी. एम पाटील, शमा कुरणे, राजेखन कुरणे, मॅनेजर किरण कोडोली व सचिव विजय नाईक यांच्यासह महाविद्यालय व रवळनाथचा स्टाफ उपस्थित होता. सूत्रसंचालन संगीता लोखंडे यांनी केले. समारोप रवींद्र हिडदुगी यांनी केला.
फोटो ओळी
नेसरी महाविद्यालयास रवळनाथ संस्थेकडून संगणक, प्रिंटर ॲड. हेमंत कोलेकर यांचेकडे प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थापक एम. एल. चौगुले, डॉ. आर. एस. निळपणकर, डॉ. डी. के. मायदेव, डॉ. अर्चना कोलेकर, मनोहर गुरबे, आर.बी.पाटील, विजय नाईक, प्रा.डॉ.डी.एम पाटील,सौ. शमा कुरणे आदी उपस्थित होते.