शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

मतदार जागृतीसाठी बनविली संगणक प्रणाली

By admin | Published: February 05, 2016 11:28 PM

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : निवडणुकीच्या अधिसूचनेपासून शपथविधीपर्यंतच्या बाबींचा समावेश

राम मगदूम-- गडहिंग्लज -देशातील संसदीय लोकशाही शासनपद्धतीची ओळख शालेय वयातच व्हावी आणि विद्यार्थ्यांना आदर्श नागरिकत्वाचे, आदर्श मतदारांचे अन् आदर्श नेतृत्वाचे धडे शालेय वयातच मिळावेत यासाठी एका तरुणाने शालेय निवडणुकीसह विविध निवडणुकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘कॉम्प्युटराईज्ड व्होटिंग सिस्टीम’ची निर्मिती केली आहे. या कल्पक तरुणाचे नाव आहे, आण्णासाहेब ऊर्फ विजय रावसाहेब देसाई.बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विजयचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण तेरणीच्या ए. आर. देसाई हायस्कूलमध्ये झाले. महागावच्या संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निमध्ये त्याने ‘इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी’ हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या ‘केआयटी’कॉलेजमधून त्याने याच विषयाची अभियांत्रिकी पदवी घेतली.अर्ध्या दिवसात पार पडणाऱ्या शालेय निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची चिंताजनक घटती आकडेवारी पाहून तो अस्वस्थ होत असे. त्यावर उपाय म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने ही प्रणाली तयार केली आहे. निवडणुकीच्या अधिसूचनेपासून शपथविधीपर्यंतच्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे.भारतीय लोकशाहीची ओळख, निवडणूक अधिसूचना, मतदार यादी, मतदार ओळखपत्र, उमेदवारी अर्ज, संकल्प पत्र, खर्चाची पावती, नमुना ७ अ, प्रचारपत्रिका, वचननामा, मान्यवरांचे मतदानासाठी आवाहन, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी, फेर मतमोजणी, निकाल, सविस्तर निकालपत्र, निवड पत्र, शपथविधी, आदी सर्व बाबी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.याकामी बुगडीकट्टीचे प्राथमिक शिक्षक मारुती राजगोळे, गौतम गुळवे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे त्याला सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांपासून या शाळेच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक त्याच्या ‘सिस्टीम’द्वारेच होत आहे.