आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी सीएसआर फंडातून दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांसाठी कॉन्सन्ट्रेटर व बायपॅप उपकरणे उपलब्ध करून दिली होती व ती तातडीने जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णालयांना सुपूर्द करावीत असे आदेश दिले होते. याचाच भाग म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाने निश्चित केल्याप्रमाणे जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक कोविड सेंटरकरिता १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ६ बायपॅप, आगर कोविड सेंटर करिता ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, कुंजवन कोविड सेंटर करिता ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत. सिद्धिविनायक कोविड सेंटर येथे साहित्य प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. प्रसन्न कुंभोजकर, डॉ. परशुराम कोळी, नगरसेवक संभाजी मोरे, दादा पाटील-चिंचवाडकर, राजेंद्र झेले, राहुल बंडगर, महेश कलकूटगी, महादेव कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील शासकीय कोविड सेंटरना उपकरणे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. प्रसन्न कुंभोजकर, डॉ. परशुराम कोळी, नगरसेवक संभाजी मोरे उपस्थित होते.