राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या विकासात सहभाग घ्यावा अशा उद्देशाने बनाचीवाडी (ता.राधानगरी) ग्रामपंचायतीने स्वतंत्र अप्लिकेशन तयार केले आहे. याचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. लोकांनी याचा वापर करण्यास सुरवातही केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सरपंच रेश्मा पाटील यांनी सांगितले.गावातीलच अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विशाल व निखील विजय घोलकर या दोघा भावांनी ते तयार केले आहे.अशा प्रकारची सेवा देणारी तालुक्यातील हि पहिलीच ग्रामपंचायत ठ्यारली आहे.
राधानगरीपासून केवळ दोन किमी अंतरावर सुमारे १८०० लोकसंख्या असलेले बनाचीवाडी ह गाव आहे. येथील विशाल व निखील हे दोघे आधुनिक तंत्रज्ञानाचे सध्या शिक्षण घेत आहेत. सरपंच रेश्मा पाटील याच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वतंत्र अप्लिकेशनची कल्पना पुढे आली आणि सहा महिन्यापासून घोलकर बंधू त्यावर काम करत होते.
या प्रणालीनुसार गावातील नागरिकांना आधार नंबरसह आपल्या मोबाइल वरून हव्या असलेल्या दाखल्यांची मागणी करता येईल,मिळणा?्या सुविधाबाबत असलेल्या तक्रारी नोंदवता येतील.ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती करुन घेता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीत जाण्याची गरज नाही घरातून किव्हा कोठूनही हे करता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने दररोज येणा?्या संदेशाची माहिती घेवून त्याबाबत काय कार्यवाही केली त्याबाबतची माहिती दुपारनंतर संबधिताना संदेशाद्वारे कळविली जाईल.अशी व्यवस्था केली आहे.
याची सुरवात सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सरपंच रेश्मा पाटील,उपसरपंच बाळासो नरसाळे,ग्रामसेवक महेश पाटील,जयवंत पत्ताडे,रघुनाथ परीट,अनिता वंजारे,शोभा धनवडे,सीताबाई कोंडवळ,सारिका परीट,जयश्री काशीद,उमेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ,कर्मचारी उपस्थित होते.
राधानगरी- बनाचीवाडी ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधेचा प्रारंभ करताना सभापती दिलीप कांबळे,सरपंच रेश्मा पाटील व अन्य