कुरुंदवाड : जगामध्ये वैज्ञानिक प्रगती झाली, मात्र एकमेकांतील संवाद संपुष्टात आला. कॉम्प्युटरवर बसून मुलांना जगाची ओळख झाली. मात्र बालपणातील खेळणे, हसणे, बागडणेच हरवून बसत आहेत. मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी गावागावांमध्ये, असे साहित्य संमेलन भरवून वैचारिक संवाद घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रमेश इंगवले यांनी केले. शिरढोण (ता. शिरोळ) येथे शिरढोण साहित्य परिषद व कविता सागर साहित्य अकादमी जयसिंगपूर यांच्यावतीने आयोजित ‘संवाद’ साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून इंगवले बोलत होते.शिरढोण गावामध्ये प्रथमच भरविलेल्या या साहित्य संमेलनास ग्रामस्थ व साहित्यिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी जि. प. सदस्य विकास कांबळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन व ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक दशरथ काळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी डी. डी. कुडाळकर, राजश्री पाटील यांची भाषणे झाली.दुपारी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासो नदाफ यांचे व्याख्यान झाले. यावेळी सुनील आसवले यांचे कथाकथन झाले. सायंकाळच्या सत्रात निमंत्रितांसह ग्रामीण भागातील नवकवींचे कवी संमेलन झाले. यावेळी शशिकांत मुद्दापुरे, डी. डी. कुडाळकर, कृष्णात बसागरे, पाटलोबा पाटील, मनोहर भोसले, डॉ. उमेश कळेकर, संजय सुतार, विष्णू वासुदेव, आदींनी कवितेतून रसिकांची मने जिंकली. संयोजन समिती अध्यक्ष विश्वास बालिघाटे यांनी स्वागत केले.
साहित्य संमेलनातून वैचारिक संवाद
By admin | Published: December 31, 2014 12:02 AM