फौंड्रीची संख्या : ३००
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कार्यरत कामगार : सुमारे दीड लाख
परराज्यांतील कामगारांचे प्रमाण : २५ टक्के
बांधकाम प्रकल्पांची संख्या : १२५
परराज्यांतील कामगारांचे प्रमाण : ८० टक्के
चौकट
कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यता केंद्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची संचारबंदी दि. १ मे पर्यंत आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना स्थालांतरित होऊ नका असे आवाहन केले. त्यानुसार कामगारांनी थांबावे. स्थलांतरित कामगारांसाठी शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यता केंद्र सुरू केले असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी सांगितले.
चौकट
गेल्यावर्षी ४६ हजार कामगार रवाना
गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ४६,६९६ इतके परराज्यांतील कामगार श्रमिक रेल्वेने मे महिन्यामध्ये आपआपल्या गावी रवाना झाले होते. त्यात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील मजुरांचे अधिक प्रमाण होते.