कोल्हापूर : ऑनलाईन वाहतूक परवाने मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत आरागिरणीधारक, व्यापाऱ्यांना मार्गदर्शन व्हावे. त्यासाठी कार्यशाळा घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघाच्या वतीने सचिव हरिभाई पटेल यांनी उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांच्याकडे केली.
या संघाची ३२ वी वार्षिक सभा टिंबर भवनमध्ये सोमवारी (दि. १) झाली. प्रमुख पाहुणे उपवनसंरक्षक काळे यांचा संघाच्या वतीने अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी अंबाबाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सचिव हरिभाई पटेल यांनी आरागिरणी हस्तांतरण, स्थानांतरण, परवाना विभाजन, मयत वारसा, आदी प्रलंबित कामे, ऑनलाईन डाटाबेसमधील दुरुस्तीच्या प्रकरणांची माहिती दिली. त्यावर उपवनसंरक्षक कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा लवकर निपटारा केला जाईल. ऑनलाईन वाहन परवान्याबाबत कार्यशाळा घेण्यात येईल, असे काळे यांनी सांगितले. संघाचे उपाध्यक्ष करसन लिंबाणी यांनी स्वागत केले. सहसचिव लक्ष्मण पटेल यांनी मागील वर्षाच्या प्रोसिडिंगचे वाचन केले. सहखजानिस जयंती रंगाणी यांनी वार्षिक हिशेब अहवालाचे वाचन केले. त्याला सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष जयंती दिवाणी, सहसचिव मोहन वेलाणी, कार्याध्यक्ष हितेंद्र रुडाणी, संचालक काकासो पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो (०४०३२०२१-कोल-टिंबर न्यूज फोटो) : कोल्हापुरात सोमवारी जिल्हा टिंबर व्यापारी व लघुऔद्योगिक संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष वसंतराव देशमुख आणि सचिव हरिभाई पटेल यांच्या हस्ते उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मण लिंबाणी, करसन लिंबाणी, हितेंद्र रुडाणी, जयंती रंगाणी, जयंती वेलाणी, आदी उपस्थित होते.