शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 12:28 PM

: राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

ठळक मुद्देराज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई ९१३ कोटींची एफआरपी थकली : शंभर टक्के एफआरपी देण्यात कोल्हापूरच पुढे

कोल्हापूर : राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहिला. विशेष म्हणजे पुणे व सोलापूर या विभागात ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे. राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये देय एफआरपी आहे. त्यापैकी २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये पैसे शेतकऱ्यांना आदा करण्यात आले आहेत.

अद्याप १२७७ कोटी ४४ लाख रुपये एफआरपी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत. ११७ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या २९ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.एफआरपी देणारे कारखाने -एफआरपी टक्केवारी   कारखान्यांची संख्या

  • ० टक्के                         १
  • १ ते ४९ टक्के                ४
  • ५० टक्केपेक्षा अधिक  ६८
  • १०० टक्के               ११७

 

  • एकूण १९० 

सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखाने

  • पाणगेश्वर, लातूर -० टक्के
  • किसनवीर, खंडाळा - ५ टक्के
  • तासगाव शुगर - २६ टक्के
  • किसनवीर, भुईंज - ३२ टक्के
  • भीमा टाकळी, सोलापूर - ४३ टक्के

दृष्टिक्षेपात यंदाचे साखर उत्पादन,                   लाख टनात -विभाग           हंगाम २०१९-२०        हंगाम २०२०-२१  जास्त

  • कोल्हापूर           २३.४१६             २७.७४                ४. ३३
  • पुणे                     १७.५२              २५.३३                 ७.८१
  • सोलापूर               ७.१८              १६.४९                 ९.३१
  • अहमदनगर        ५.८७               १६.६९              ११.०२
  • औरंगाबाद          ३.७१                  ९.७०                ५.९९
  • नांदेड                  ३.१२                 ९.४०                 ६.२८
  • अमरावती            ०.४१                ०.५२                ०.११
  • नागपूर              ०.५४५                ०.३९              ०.१५
टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर