प्रकाश पाटीलकोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. पण कोरोना व महापूर यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान निवडणुका कार्यक्रम सुरू झाला कच्ची पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि ग्रामपंचायत निवडणुका सुरू झाल्याने राज्य शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलल्या होत्या.दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबवण्यात आल्या होत्या त्या टप्प्यावर सुरू करण्याचे आदेश दिल्याने 21 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून वैभव नावडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांना नियुक्त करण्यात आले. प्राधिकरणाला निवडणुकीचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. हा आराखडा मंजूर होऊन 6 जानेवारी 2023 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू होते.मात्र निवडणूक अधिकारी यांना सहकार प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रमाच्या आराखड्याची मंजुरी आली नसल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर 5 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. पण आज ही निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने 6 जानेवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत का याबाबत उलट सुलट चर्चा इच्छुक व कुंभी कासारी कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये सुरू झाली आहे. याबाबत निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रशासन कोणतीच माहिती देत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कुंभी कासारीच्या निवडणुकीबाबत अद्याप आदेशच नाही, सभासदांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:37 PM