कोल्हापूर : क्षयरोगावर उपचार सुरू असताना अक्षय गायकवाड हा रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईक आणि ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांच्या कार्यालयात धरणे धरून दोन तास घोषणाबाजी केली. डॉक्टर व एक्सरे टेक्निशियन यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने गोंधळ माजला होता. रात्री उशिरा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
राजेंद्रनगरातील अक्षय गायकवाड (वय २४) याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्याचा शनिवारी मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींनी धरणे आंदोलन केले. प्रभारी अधिष्ठाता डॉ अजित लोकरे यांनी नातेवाईक व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. चर्चेनंतर लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, चौकशी समिती नेमून, ४ दिवसात संबंधित डॉक्टर आणि एक्सरे तंत्रज्ञ यांच्याविषयीचा अहवाल देण्याचे आश्वासन प्रभारी अधिष्ठाता डाॅ. लोकरे यांनी दिले.
फोटो नं. ०४०९२०२१-कोल-सीपीआर
ओळ :
डॉक्टर व तंत्रज्ञाच्या हलगर्जीपणामुळे क्षयरोगावर उपचार घेणारा रुग़्ण दगावल्याने नातेवाईकांनी व आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांच्याशी चर्चा केली.
040921\04kol_8_04092021_5.jpg
ओळ : डॉक्टर, तंत्रज्ञाच्या हलगर्जीपणामुळे क्षय रोगावर उपचार घेणारा रुग़्ण दगावल्याने नातेवाईकांनी व आरपीआर’च्या कार्यकर्त्यांनी गोधळ घालून प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजीत लोकरे यांच्याशी चर्चा केली.