: वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षण ठेवल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला न्याय दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून वैद्यकीय/ दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अन्य मागासवर्ग (ओबीसी ) कोट्यातील २७ टक्के आणि आर्थिक मागास कोट्यातील १० टक्के विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाचा पुढचा भाग म्हणून आता मोदी सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठीही आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी व शैक्षणिक प्रवेश यात कोणतेही आरक्षण नसणाऱ्या वर्गाला मोदी सरकारने न्याय दिला आहे.