शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

जयंत आसगावकर यांच्या विजयाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:19 AM

प्रा. जयंत आसगावकर यांना शिक्षक मतदारसंघातील कॉंग्रेसची उमेदवारी देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत पालकमंत्री पाटील यांनी मोठी भूमिका ...

प्रा. जयंत आसगावकर यांना शिक्षक मतदारसंघातील कॉंग्रेसची उमेदवारी देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत पालकमंत्री पाटील यांनी मोठी भूमिका निभावली. विधान परिषदेतील या विजयाबद्दल कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, करवीर, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, चंदगड, आजरा, आदी तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून पालकमंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शब्द खरा करून दाखविलात. आपल्यामुळे जिल्ह्याला पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघातील आमदारकी मिळाली, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, ॲड. गुलाबराव घोरपडे, आनंद माने, सचिन चव्हाण, संध्या घोटणे, प्रमोद बुलबुले, किरण मेथे, राहुल खंजिरे, आदी उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समिती, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, आदी, विविध संघटनांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवदने दिली.

चौकट

शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा

कोल्हापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री पाटील यांना दिले. जाचक अटी असलेल्या संच मान्यतेचे परिपत्रक रद्द करावे. शाळा तेथे शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करावी, आदी मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या मागण्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करण्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, रणजित पाटील, समवेल सौंदडे, ऋषिकेश पाटील, प्रशांत मोटे, आदी उपस्थित होते.

चौकट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

कॉंग्रेस कमिटीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.