कोल्हापूर : दरवर्षी छत्रपती शिवाजी चौकात होणारी साखर वाटप, शेकडो लोकांच्या उपस्थितीत केक कापून होणार जल्लोष, शालेय मुलामुलीसाठी होणारी बच्चन चित्रकला स्पर्धा, रात्री होणारी बर्थ डे पार्टी अशा बहुरंगी जल्लोषाला फाटा देत कोल्हापुरात शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा ऑनलाईन पद्धतीने वाढदिवस साजरा झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सामाजिक, करमणूक कार्यक्रम बंदीस मान देत कोल्हापुरातील बच्चंनवेडे ग्रुपने ह्यावर्षी महानायक अमिताभ बच्चंन यांचा ७८वा वाढदिवस ऑनलाईन साजरा केल्याचे ग्रुपचे एडमीन सुधर्म वाझे,व्हाईस एडमीन राजू नानंदरे , महिला सरपंच डॉ. हर्षला वेदक, सरपंच सर्वश्री राजू बोरगावे, प्रकाश मेहता ,प्राचार्य किरण पाटील, सचिन लिंग्रस, सचिन मणियार यांनी सांगितले.बच्चनवेडे ग्रुपतर्फे आज ऑनलाईन पध्दतीने मनोरंजन कार्यक्रम झाले. यात ग्रुपमधील १० गायकांनी फेसबुक लाईव्हद्वारे ७८ गाणी सादर केली. याशिवाय स्टारमेकर ह्या गाण्याच्या अँप वर १० सदस्यांनी ७८ बच्चंन गाणी सादर केली. कोल्हापूरतील साईक्स एक्सटेन्शन तसेच ताराराणी गार्डन येथील महानायक सहवास येथे अनेकांनी सहकुटुंब सेल्फी काढले, छायाचित्रे काढली तसेच ती फेसबुक,व्हाट्सअप, इन्स्टाग्राम आशा समाज माध्यमातून प्रसारित केले.
बच्चन यांच्या जन्म दिवसाच्या मुहूर्तावर सोने, चांदीसह विविध किमती वस्तू खरेदी करण्यात आल्या. शिवाय या मुहूर्तावर वही वाटप , शूज वाटपही करण्यात आले. हे करतांना पाचहून अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घेतली गेलीयाशिवाय चिल्लर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बच्चन यांची गाणी गाऊन त्याना शुभेच्छा दिल्या. मिलिंद यादव, अनिल काजवे, राजेंद्र नाईक यांनी गाणी गायली. याशिवाय २०१४ पासून कोल्हापूर शहरात कार्यरत असलेल्याशिवाजी पेठेतील डॉ. देवेंद्र रासकर मित्रपरिवार या ग्रुपच्या वतीनेही आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.