शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

जातींच्या नावाचे महासंघ निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:56 AM

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या ...

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती लेखक डॉ. आनंद पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, साहित्यिक लक्ष्मणराव मोहिते, व्यंकाप्पा भोसले, मीरासाहेब मगदूम, प्राचार्य दिनकर खाबडे, डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, हसन देसाई, पी. बी. पवार, आदींची होती. डॉ. आनंद पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.सबनीस म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मांत कट्टरवाद आला आहे का?, भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे. डॉ. आनंद पाटील म्हणाले, लहानपणापासूनच मुलांवर बाराखडीमधून वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण इथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही. जे. बी. शिंदे म्हणाले, बुद्धांच्या मानवतावादी विचारांच्या मनन, चिंतन व अनुकरणासाठी गेली आठ वर्षे हे संमेलन आयोजित केले जात आहे. देसाई, मोहिते, प्रा. शिंदे यांनी विचार मांडले. राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन, विशाखा जितकर यांनी आभार मानले.शासकीय पुजारी नियुक्तीचा अभिनंदनपर ठरावकरवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर हाच कायदा महाराष्टÑातील इतर मठ व मंदिरांना लागू करून जमलेल्या पैशांतून समाजहिताची कामे करावीत यासह विविध आठ ठराव जे. बी. शिंदे यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.यांचा झाला गौरवसंमेलनात डॉ. जयश्री चव्हाण, गुलाब अत्तार, अशोक चौगुले, बाबूराव शिरसाट यांचा प्रबोधन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.