या वेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीत सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अशातच इंधन दरवाढीबरोबरच जीवनावश्यक वस्तूंमध्येही दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्यांना झटका दिला आहे. त्यामुळेच सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार राज्यभरात पाच हजार ठिकाणी आंदोलन केले जात आहे.
या वेळी शेतकरीविरोधी मोदी सरकारचा निषेध असो, वाह रे मोदी तेरा खेल सस्ती, दारू महंगा तेल, मोदी हटाव देश बचाव, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, निकू पाटील, किरण कोकरे, बबन घाटगे, नितीन साळुंखे, संदीप चावरेकर, अरुण आवळेकर, रमिज मकानदार, प्रा. सुधाकर सोनाळकर, अमोल बन्ने, प्रशांत हांडोरी, अमृत ढोले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो :
निपाणी : काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.