शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

खानापुरात मराठी मतांच्या विभागणीवर काँग्रेस, भाजपचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:23 PM

समीर देशपांडे ।बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मतदारसंघात आहे.गेल्या विधानसभेवेळी खानापूर मतदारसंघातून एकीकरण समिती एकसंघ असल्याने अरविंद पाटील विजयी झाले होते. यावेळी ...

समीर देशपांडे ।बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मतदारसंघात आहे.

गेल्या विधानसभेवेळी खानापूर मतदारसंघातून एकीकरण समिती एकसंघ असल्याने अरविंद पाटील विजयी झाले होते. यावेळी मात्र एकीकरण समितीमध्येच उभा दावा निर्माण झाला आहे. आमदार पाटील यांनी निवडून गेल्यानंतर मराठी जनतेच्या भावनांशी प्रतारणा केल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर पाटील गटाकडून होत आहे. सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या सीमाप्रश्न जागर अभियानावेळी सर्वसामान्य मराठी भाषिकांनी यंदा उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला. तो आम्ही वरिष्ठांना कळवला, परंतु लोकभावना विचारात न घेता अरविंद पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याचा आरोप करत तालुका एकीकरण समितीने विलास बेळगावकर यांना उमेदवारी दिली आहे. अनेक ठिकाणी त्यांना निधीही दिला जात आहे.आमदार अरविंद पाटील हे विकासकामांच्या जोरावर मते मागत आहेत. त्यांनी कामे करताना मराठी, कर्नाटकी असा फारसा भेदभाव केला नाही. तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. पाटील यांनी सत्तेचा उपयोग करत अनेक बडे उपनेतेही आपल्या बाजूने वळवून घेतले आहेत. केवळ पश्चिम भागातील मराठी मतांवरच अवलंबून न राहता त्यांनी पूर्वेकडील कन्नड भाषिकांच्या मतांसाठीही चांगली जोडणी घातली आहे, परंतु याच त्यांच्या कामाच्या पद्धतीचा उलटा प्रचार तालुका समितीकडून होत आहे. बेळगावकर हे सीमावासीयांच्या भावनेला हात घालत आहेत. आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला असता; पण कोल्हापुरातून गडबडीने उमेदवारी जाहीर का केली, असा प्रश्न दिगंबर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

गत विधानसभेला अपक्ष रिंगणात उतरूनही तिसऱ्या क्रमांकाच्ी मते घेतलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांना यंदा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्याबाबतही पक्षातील काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद हे माहेर आणि कोल्हापूर सासर असलेल्या निंबाळकर या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भाची असून, कर्नाटकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. निंबाळकर हे बेळगावला जिल्हा पोलीसप्रमुख असताना मराठी मतदारांची मोठी संख्या असलेल्या खानापूर मतदारसंघावर त्यांची नजर गेली आणि यंदा तर ते पत्नीला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी ठरले.

जनता दलामध्ये सहा महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले नासीर बागवान हे देखील यावेळी रिंगणात आहेत. २००८ साली भाजपचे आमदार राहिलेले कै. प्रल्हाद रेमाणी यांचे चिरंजीव ज्योतिबा यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.मतदारसंघाचे नाव --: खानापूर - मतदार संख्या : २,०४,६४६गावे आणि वाड्या : २५६, एकूण उमेदवार: १२खानापूर मतदारसंघातील खानापूरचे मध्यवर्ती एकीकरण समितीचे उमेदवार आमदार अरविंद पाटील यांची नंदगड येथील प्रचारफेरी.एकी, माघारीसाठी दबावबेळगाव : केवळ सहा दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.शनिवारी दुपारी वडगाव, जुने बेळगाव आणि भारतनगर येथील कार्यकर्त्यांनी दबाव तयार केल्याने शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर आणि मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी दोघेही नेते बैठकीस उपस्थित राहिले. दोघांनीही उमेदवार निवडीच्या प्रकियेबाबत माहिती दिली.दीपक दळवी यांनी माघार किंवा निर्णय घेण्याबाबत वरिष्ठांना विचारून घेऊ, अशी भूमिका मांडली. यावेळी काहीनी दोन्ही उमेदवारांना एकत्र बोलवून एकीची प्रक्रिया आणि माघारीबाबत मागणी केली. या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही. मात्र, कार्यकर्ते एकच उमेदवार द्या म्हणून आक्रमक झाले होते.किरण सायनाक आणि प्रकाश मरगाळे आणि दळवी, ठाकूर यांच्या समक्ष पुन्हा एकदा शनिवारी सायंकाळी बैठक होणार आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटक