कोल्हापूर : महाविकास आघाडीच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना पंधराशे रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना पंधराशे रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे.
ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे रिक्षाचालकांसाठी नोंदणी सुविधा सुरू करण्यात आली.यासाठी रिक्षाचालकांनी वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर. सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.यावेळी, दिपक थोरात, ऋषिकेश पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, सचिन चावरे, आनंदा करपे, अक्षय शेळके, उदय पवार, विनायक पाटील, सुदर्शन तुळसे संजय वाईकर,आदी उपस्थित होते.