शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

महागाईविरोधात काँग्रेसची निपाणीत सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:18 AM

निपाणी : देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात चिकोडी तालुका काँग्रेस, निपाणी ब्लॉक काँग्रेस व बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस यांच्यावतीने निपाणी शहरात सायकल ...

निपाणी : देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात चिकोडी तालुका काँग्रेस, निपाणी ब्लॉक काँग्रेस व बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस यांच्यावतीने निपाणी शहरात सायकल रॅली काढण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती शिवाजी महाराज चौकातून या सायकल रॅलीला प्रारंभ झाला. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. शिवाजी चौकातून प्रारंभ होऊन रॅली नेहरू चौक, गुरुवार पेठ, बसवेश्वर सर्कल, चिकोडी रोड, छत्रपती संभाजी सर्कल, नगरपालिका, बेळगाव नाका या मार्गावरून येऊन नाथ पै चौक येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाचे दर वाढवले असून, यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. यापूर्वी महागाईला विरोध करणारा भाजप यावेळी गप्प आहे. यामुळे सरकारविरोधात ही रॅली काढण्यात आली आहे.

यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या आदेशानुसार ही रॅली काढण्यात आली आहे. सरकारेला जागे करण्यासाठी ही रॅली आहे. या रॅलीत बैलगाडी घेऊनही कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायकल रॅलीत जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाल ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, नगरसेवक विलास गाडीवडर, बाळासाहेब देसाई सरकार, दत्ता नाईक, संजय सांगावकर, डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर, सुनील पाटील, अस्लम शिकलगार, अनिस मुल्ला, दीपक सावंत, निकू पाटील, निपाणी शहर व ग्रामीण भागातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो

निपाणी : काँग्रेस पक्षाच्यावतीने महागाईविरोधात काढलेल्या रॅलीचा प्रारंभ माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. यावेळी लक्ष्मणराव चिंगळे, राजेश कदम, राजेंद्र वडर, पंकज पाटील उपस्थित होते.

१७ निपाणी काँग्रेस रॅली