कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला.स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कमिटी कार्यालयासमोर हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद द्विगुणित केला.
आनंदोत्सवात विक्रम जरग, संपतराव चव्हाण-पाटील, संजय पोवार-वाईकर, एस. के. माळी, किशोर खानविलकर, डॉ. प्रमोद बुलबुले, बाबूराव कांबळे, किरण मेथे, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरला पाटील, दीपा पाटील, महम्मद शरीफ शेख, प्रदीप चव्हाण, सुलोचना नाईकवडी, वैशाली महाडिक, मंगल खुडे, शुभांगी साखरे, रंजना पवार, उज्ज्वला चौगुले, पूजा आरडे, तानाजी लांडगे, वसंत यलूरकर, मारुती पाटील, प्रदीप शेलार, उमेश पोरलेकर, राहुल मांढरे, मधुकर पाटील, शिराज शेख, संजीव चिकुर्डेकर, सुनील फल्ले, विजयानंद पोळ, सफॅराज रिकीबदार, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.