महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 12:52 PM2020-11-02T12:52:09+5:302020-11-02T12:54:19+5:30

Congress, Muncipal Corporation, Ruturaj Patil, kolhapur, Election गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Congress flag on NMC again: Rituraj Patil | महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील

महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील

Next
ठळक मुद्देमहापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही आवाहन त्यांनी केले. लक्ष्मीपुरी येथील पूरग्रस्तांना बांधून दिलेल्या घरांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आघाडीच्या नगरसेवकांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे सत्ता आघाडीचीच येणार आहे तरीही आतापासूनच सर्वांनी तयारीला लागावे. ज्या प्रभागात कमी पडतो तेथे ताकदीने लढू.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, विकासकामांच्या उद्‌घाटनावेळी आघाडीतील सदस्यांनी किती चांगली कामे केलीत हे दिसून येते. आगामी निवडणुकीत याचा आघाडीला नक्कीच फायदा होणार आहे तसेच निवडणुकीत ताकदीने उतरून पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळवू.

महापौरांचे कौतुक

सर्व सदस्यांनी पुरावेळी प्रामाणिकपणे काम केले. निलोफर आजरेकर या महिला असूनसुद्धा त्यांनी महापौरपदाची चांगली जबाबदारी पार पाडली. कोरोनाकाळात चांगले काम केले. त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. त्या नेहमी कामात राहिल्या. त्याचे फळ नक्कीच आघाडीला मिळणार असल्याचेही आमदार पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Congress flag on NMC again: Rituraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.