साहिल शहा।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : कोरेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे निश्चित आहे. भाजपने ग्रामपंचायतींवर ताबा मिळविण्यासाठी मीशन हाती घेतले असले तरी गावपातळीवर पक्षसंघटन बळकट केले नसल्याने त्यांना यशासाठी झगडावे लागणार आहे. शिवसेनेत पदाधिकारी निवडण्यात अनेकांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर असून, पक्षसंघटनेत मरगळ आली आहे.
कोरेगाव तालुक्याचा विस्तार दक्षिणोत्तर असून, तिन्ही विभागांतील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यावर यापूर्वी काँग्रेसचेच वर्चस्व होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादी काँग्रेसने तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील ते कायम राहिले आहे.एकंदरीत आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षसंघटना बळकट करीत असताना ग्रामीण भाग सातत्याने पिंजून काढत लोकांशी थेट संपर्क ठेवला असल्याने राष्टÑवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणे अशक्य नाही. जिल्हापरिषद व पंचायत समितीत सत्ता असल्याने त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाला आहे, त्यामुळे राष्टÑवादी निर्धास्त आहे.
काँग्रेसमध्ये चैतन्य नसल्याने ग्रामीण भागातील घडी विस्कटली आहे. पक्षसंघटना आणि पदाधिकाºयांमध्ये अपेक्षित असा समन्वय नसल्याने पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींचे तालुक्यावर लक्ष होते. मात्र,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यशमिळाले नसल्याने नेतेमंडळीदेखील दुर्लक्ष करीत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार होताना दिसत आहे.कोरेगाव तालुक्यावर भाजपने चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत केले आहे.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर तालुक्यावर विशेष प्रेम दाखविले आहे. त्यांनी नुकताच दौरा करून अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाचा कानमंत्र दिला असून, कार्यकर्ते आता चार्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळविता येणार नसले तरी यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे, हे निश्चित.अस्तित्व कागदावरच...शिवसेनेचे तालुक्यात अस्तित्व आता कागदावरच राहिले आहे. पक्षसंघटनेत बदल करीत असताना कोरेगाव तालुक्याला डावलण्यात आले आणि अनेक शिवसैनिकांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्टÑ केला. परिणामी पक्ष संघटना डळमळीत झाली आहे. एकूणच पक्षसंघटनेत मरगळ आहे.