कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले.येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. जय पटकारे यांना १५८0 मते मिळाली तर अजित राऊत यांना १७0६ मते मिळाली.दोन्हीही प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमुळे शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ परिसरांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सिध्दार्थनगर प्रभागात सुमारे ६०.९४ टक्के तर पद्माराजे उद्यान प्रभागात ५८.९३ टक्के मतदान झाले होते.
अजित राऊत प्रभागनिहाय उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतेसिद्धार्थनगर प्र. क्र. २८ - ताराराणी आघाडीचे नेपोलियन अशोक सोनुले यांना १२0९ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार सुशिल सुधाकर भांदिगरे यांना ८४0 मते मिळाली. काँग्रेसचे जय बाळासो पटकारे यांना १५८0 मते मिळाल्याने ते ३७१ मतानी विजयी झाले. ३३ मते नोटासाठी मिळाली.पद्माराजे उद्यान प्र. क्र. ५५- शिवसेनेचे पीयूष मोहन चव्हाण यांना ६४३, शेकापचे स्वप्निल भीमराव पाटोळे यांना १७२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित विश्वास राऊत यांना सर्वाधिक १५८0 मते मिळाली. ते १०६३ मतानी विजयी झाले.
या प्रभागात तीन अपक्ष उभे राहिले होते. त्यातील महेश शंकरराव चौगले यांना ३४४, शेखर महादेव पोवार यांना १२५ आणि राजेंद्र वसंतराव चव्हाण यांना ३३४ मते मिळाली. २२ मते या प्रभागात नोटाला मिळाली.शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ या पेठांचे कोल्हापुरात राजकीय वजन आहे. दोन्हीही पेठांनी महापालिकेच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव ठेवला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही पेठांत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.महापौर निवडणुकीसाठी दोन्हीही जागा महत्त्वाच्या असल्याने नेत्यांची घालमेल सुरू होती. पद्माराजे उद्यान प्रभागात सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या केंद्राव रराष्ट्रवादीचे आर. के. पोवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील तसेच ऋतुराज क्षीरसागर हे ठिय्या मारून होते तर सिद्धार्थनगर मतदान केंद्रावर ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, तर काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुलाणी, मोहन सालपे थांबून होते.