निपाणी - दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निपाणी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी समोर आले. उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण पंचायतीचे निकाल समजू शकले नाहीत, पण आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस पुरस्कृत आघाडीने वर्चस्व मिळवल्याचे चित्र दिसून आले आहे. अतिशय चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत बहुतांश उमेदवार हे एक-दोन-तीन अशा फरकाने निवडून आले आहेत.निपाणी तालुक्यातील 27 ग्राम पंचायतींसाठी 27 डिसेंम्बरला मतदान झाले होते. बुधवारी याचे निकाल जाहीर झाले. उशिरापर्यत मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण निकाल हाती आले नाहीत. पण जाहीर झालेल्या पंचायत क्षेत्रात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याचे समोर आले आहे.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्रावर विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी पोलीसांचा फौजफाटा होता. येथील जी आय बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली. एकूण 198 कर्मचाऱ्यांनी ही मतमोजणी केली. चुरशीने निवडणूक झाली तरी मतमोजणी शांततेत पार पडली. सकाळी 8 वाजता पहिली फेरी झाली. यानंतर दुसरी व तिसरी अश्या 3 फेऱ्या झाल्या. काही पंचायतीची मतमोजणी मात्र उशिरा सुरू झाली.दिवसभरात जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी चोख व्यवस्था केल्याने कोणताच गोंधळ झाला नाही. अकोळ क्रॉस व ग्रीन पार्कच्या प्रवेशाला पोलिसांनी रस्ता बंद केला होता.निकाल लागलेल्या पंचायतीकोडणी सौंदलगा, कोगनोळी अकोळ, गळतगा, भोज, मांगुर, कारदगा, बेडकिहाळ, कुरली बेनाडी, कुन्नर, शिरदवाड, आडी, लखनापूर, मानकापूर, यमगर्णी, शिरगुप्पी, जत्राट, आप्पाचीवाडी, हुन्नरगी, शेंडुर, ममदापूर, बारवाड, यरणाळ, ढोणेवाडी, सिदनाळ,