लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे - करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यात स्थानिक आघाड्यांनी - २५ , काँग्रेसने - १७, शिवसेना - ७,राष्ट्रवादी - २ तर भाजपने ३ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस यांचे सत्तेसाठी साटेलोटे झाल्याचे स्पष्ट चित्र स्थानिक आघाड्यांना मिळालेल्या सत्तेतून दिसून येत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने एकहाती वर्चस्व असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. येथे १३ पैकी ११ ग्रामपंचायतींवर सतेज पाटील गटाची सत्ता आली आहे. करवीरमध्ये स्थानिक आघाड्यांमुळे काँग्रेस व शिवसेनेला जेमतेम पक्षीय यश मिळाले आहे.
(करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचे गाव सरपंच व उपसरपंच नावे पुढील प्रमाणे)
१) आमशी - सरपंच - उज्ज्वला रामनाथ पाटील, उपसरपंच - नामदेव दिनकर पाटील २) कोपार्डे - शारदा नामदेव पाटील, उपसरपंच -सरदार रघुनाथ जामदार ३) आडूर - सरपंच -भगवान राजाराम भोसले, उपसरपंच -गितांजली जयवंत चौगले ४) भामटे - सरपंच - (रिक्त) उपसरपंच - भगवान विश्वास देसाई ५) कोगे - सरपंच - नीलम संतोष पाटील, उपसरपंच - बाजीराव संभाजी निकम ६) कळंबे तर्फ कळे - सरपंच - सरदार बंडू पाटील, उपसरपंच - सविता शामराव सुतार ७) गाडेगोंडवाडी - सरपंच (रिक्त) उपसरपंच - शुभांगी दत्तात्रय मिठारी ८) बाचणी - सरपंच - वैशाली मच्छिंद्र साळवी, उपसरपंच - वासंती नामदेव कारंडे ९) पाटेकरवाडी - सरपंच सुनीता बाजीराव पाटील, उपसरपंच - सचिन मारुती पाटील १०) म्हालसवडे - सरपंच - संदीप यल्लाप्पा कांबळे, उपसरपंच - सचिन गणपती पाटील ११) कुडित्रे - सरपंच - ज्योत्स्ना युवराज पाटील, उपसरपंच - राजाराम बाजीराव कदम १२) गर्जन - सरपंच - मधुकर कुंडलिक नाईक, उपसरपंच - अनुराधा विशाल कांबळे १३) महे - सरपंच- सज्जन तुकाराम पाटील, उपसरपंच - रूपाली युवराज बोराटे १४) पीरवाडी - सरपंच - आकाशी सूर्यकांत लाड, उपसरपंच - उत्तम गुंडू शेळके १५) घानवडे - सरपंच (रिक्त), उपसरपंच - प्रकाश परसू कांबळे १६) तेरसवाडी - सरपंच - बबन भिकाजी कदम, उपसरपंच - महादेव आनंदा सुतार १७) हळदी - वादग्रस्त निर्णय राखीव १८) देवाळे - सरपंच - शालन बाबूराव पाटील, उपसरपंच - संजय कोंडीराम धुमाळ १९) पडवळवाडी - सरपंच पोपट दत्तात्रेय अतिग्रे, उपसरपंच - दीपाली शशिकांत पडवळ २०) रजपूतवाडी - सरपंच - रामसिंग हिरासिंग रजपूत, उपसरपंच - प्रवीण सखाराम कांबळे २१) कुर्डू - सरपंच - अश्विनी संतोष सुतार, उपसरपंच - धनाजी मारुती पाटील २२) येवती - सरपंच - वीरधवल किरणसिंह पाटील, उपसरपंच - संतोष केरबा कांबळे २३) बेले - सरपंच नाजुका दीपक पाटील, उपसरपंच - बाजीराव यशवंत लांबोरे २४) कुरुकली - सरपंच रोहित चंद्रकांत पाटील, उपसरपंच - दीपाली दत्तात्रय पाटील २५) कोथळी - सरपंच - मंगल रंगराव पाटील, उपसरपंच -धीरजसिंह यशवंत आमते २६) सडोली खालसा - सरपंच - अमित मारुती पाटील, उपसरपंच - तेजस्विनी तानाजी पाट २७) भुयेवाडी - सरपंच - सचिन सर्जेराव देवकुळे, उपसरपंच - संभाजी हंबीरराव खोत २८) खेबवडे - सरपंच (रिक्त), उपसरपंच - सुयोग सुभाष वाडकर-चौगले २९) वडकशिवाले - सरपंच उपसरपंच - दोन्ही पदे रिक्त ३०) केर्ली - सरपंच विजयमाला बाबासाहेब चौगुले, उपसरपंच - सचिन रंगराव चौगुले ३१) तामगाव - सरपंच - सुरेखा लक्ष्मण हराळे, उपसरपंच - महेश तानाजी जोंधळेकर ३२) बालिंगा - मयूर मधुकर जांभळे, उपसरपंच - पंकज पांडुरंग कांबळे ३३) पाडळी खुर्द - सरपंच - तानाजी महादेव पालकर, उपसरपंच - सुवर्णा प्रकाश पाटील ३४) शिंदेवाडी - सरपंच रंजना आंबाजी पाटील ३५) साबळेवाडी - सरपंच ज्योती संभाजी आंबी, उपसरपंच - नामदेव बळवंत पाटील ३६) हणमंतवाडी - सरपंच - संग्राम हिंदुराव भापकर, उपसरपंच - तानाजी धोंडीराम नरके ३७) नागदेववाडी - सरपंच - योगेश संभाजी ढेंगे, उपसरपंच - शिवानी पंकज दिवसे ३८) खुपिरे - सरपंच - दीपाली रमेश जांभळे, उपसरपंच - युवराज आनंदा पाटील ३९) हलसवडे - सरपंच - शीला राहुल पाटील, उपसरपंच - मोहन रावसाहेब खोचगे ४०) सांगवडे - सरपंच - रूपाली उत्तम कुंभार, उपसरपंच - रोहित विजय पाटील ४१) इस्पुर्ली - सरपंच - राजाराम सदाशिव पाटील, उपसरपंच - राजाराम गोविंद चौगले ४२) नांदगाव - सरपंच - भगवान चांभार, उपसरपंच - मयुरी संग्राम नरके ४३) गिरगाव - सरपंच - महादेव मल्लू कांबळे, उपसरपंच - जालिंदर पंडित पाटील ४४) न्यू वाडदे - सरपंच सुनीता गुरुदेव धडके, उपसरपंच - दत्तात्रय बाळू पाटील ४५) कोगील बुद्रुक - सरपंच - मधुली श्रीकांत गुडाळे, उपसरपंच - अर्चना सुरेश गणेशाचारी ४६) कोगील खुर्द - सरपंच चंद्रकांत पांडुरंग गुरव, उपसरपंच - सुरेखा सतीश कांबळे ४७) निगवे दुमाला - सरपंच - सुवर्ण बाबासाो एकशिंगे, उपसरपंच - धनाजी रघुनाथ पाटील ४८) मुडशिंगी - सरपंच - अश्विनी अरविंद शिरगावे, उपसरपंच- तानाजी कृष्णात पाटील ४९) शिये - सरपंच - रेखा प्रकाश जाधव, उपसरपंच - शिवाजी दिनकर गाढवे ५०) उपवडे - सरपंच (रिक्त), उपसरपंच - कृष्णात पांडुरंग पाटील ५१) म्हारूळ - सरपंच - वंदना म्हाकवेकर, उपसरपंच - सागर चौगले ५२) खाटांगळे - सरपंच( रिक्त), उपसरपंच - एकनाथ पांडुरंग पाटील ५३) चाफोडी - सरपंच - पंढरीनाथ शामराव भोपळे, उपसरपंच - सुनीता उत्तम खोंद्रे ५४) आरे - सरपंच - अनिता निवास मोहिते, उपसरपंच -एकनाथ सदाशिव गुरव.
चौकट १) भामटे, खाटांगळे, उपवडे, वडकशिवाले, खेबवडे, घानवडे, गाडेगोंडवाडी या सात ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षण असलेल्या प्रवर्गाचा सदस्य नसल्याने फक्त उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. तहसीलदार याबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवणार असून नव्याने आरक्षण नाही झाले तर या गावांचा कारभार उपसरपंचालाच सरपंच म्हणून करावा लागणार आहे
३) वडकशिवाले येथे अनुसूचित जाती स्त्री सरपंच आरक्षण आले. या निवडणुकीत या प्रवर्गाचा उमेदवार येथे निवडून आलेला नाही. आज सरपंच निवडीला एकही नूतन सदस्य हजर राहिला नसल्याने सरपंच, उपसरपंच निवड झालेली नाही.
(फोटो सकाळी पाठवला आहे)