समीर देशपांडे ।कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी ३० डिसेंबरला होत असल्याने तालुकास्तरावरील रााजकारण तापले आहे. जिल्ह्याचा आढावा घेता १२ पैकी सहा पंचायत समित्यांवर प्रत्येकी तीन कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सभापती होणार आहेत. शिवसेनेचे दोन ठिकाणी, तर भाजप, जनसुराज्य आणि गडहिंग्लजच्या स्थानिक ताराराणी आघाडीचा प्रत्येकी एक सभापती होणार आहे. हातकणंगले येथे काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.आजऱ्यात खेडेकर यांना संधी शक्य
आजरा : आजरा पंचायत समितीमधील सहापैकी पाच सदस्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. आता राष्ट्रवादीच्या रचना होलम या सभापती आहेत. सभापतिपद खुले झाल्याने उदय पवार (पेरणोली) आणि बशीर खेडेकर (आजरा) या दोघांची नावे चर्चेत आहेत. मात्र, उर्वरित कालावधीत या दोघांनाही संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नियोजन आहे. आजतागायत मुस्लिम समाजाला सभापतिपद न मिळाल्याने बशीर खेडेकर यांना सुरुवातीला सभापती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर शेवटचे सव्वा वर्ष उदय पवार यांना संधी देण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांत आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के. पी. पाटील हे याबाबत निर्णय घेतील.गडहिंग्लजच्या सभापतिपदी रूपाली कांबळे निश्चित
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे सुरुवातीला दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर भाजपच्या जयश्री तेली सभापती झाल्या. मात्र, नंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला. त्यानंतर स्थानिक ताराराणी आघाडीच्या विजय पाटील यांना संधी मिळाली; परंतु आता अनुसूचित जातीसाठी सभापतिपद आरक्षित असून, स्थानिक ताराराणी आघाडीच्या हत्तरकी गटाच्या रूपाली कांबळे या एकमेव या पदाच्या दावेदार आहेत.
चंदगड सभापतिपदी अनंत कांबळे निश्चितचंदगड : चंदगडला सध्या माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील गटाचे बबन देसाई सभापती आहेत. या ठिकाणी आता राजकीय संदर्भच बदलले आहेत. या ठिकाणी भरमू अण्णांचे तीन सदस्य, राष्ट्रवादीचे तीन सदस्य, स्वाभिमानी आणि गोपाळराव पाटील गटाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या ठिकाणी गोपाळराव पाटील म्हणजेच भाजपचे अॅड. अनंत कांबळे हे एकमेव सभापतिपदासाठी पात्र सदस्य असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जाते.
कागलमध्ये मंडलिक गटाच्या विश्वास कुराडे यांना संधी शक्यकागल : कागल पंचायत समितीचे सभापतिपद खुले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाच सदस्य असून, शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. यातील चार संजय मंडलिक यांना, तर एक संजय घाटगे यांना मानणारे आहेत. विद्यमान सभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे यापुढच्या काळासाठी संजय मंडलिक गटाचे विश्वास कुराडे (चिखली) हे या पदाचे दावेदार आहेत. मात्र, रमेश तोडकर (लिंगनूर) हे राष्ट्रवादीचे सदस्यही इच्छुक आहेत; परंतु अधिकाधिक संधी संजय मंडलिक गटालाच राहणार आहे.
भुदरगडमध्ये देसाई, की नलवडे यांना संधीभुदरगड : या ठिकाणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची पंचायत समितीवर सत्ता आहे. आबिटकर गटाच्या सरिता वरंडेकर यांनी सभापतिपद भूषविले आहे. आता याच गटाच्या ( पान ४ वर)
हातकणंगले : सभापतिपदासाठी कमालीची चुरसहातकणंगले : हातकणंगले येथे सध्या जनसुराज्य पक्षाचा सभापती आहे. जनसुराज्य आणि भाजपा मिळून येथे ११ पंचायत समिती सदस्य असून, विरोधामध्ये आवाडे यांची ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, अपक्ष आणि कॉँग्रेस असे ११ सदस्य एकत्र आहेत. गेल्यावेळी कॉँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने जनसुराज्यला सभापतिपद मिळाले होते. मात्र, आता दोन्ही बाजूंना ११ जण कायम राहिले तर मात्र ही निवड चिठ्ठीवर होऊ शकते.