कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत सोमवारी अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने आपली चार मते कॉँग्रेसच्या पारड्यात टाकली. गेली दोन वर्षे ताब्यात असलेली ताराराणी मार्केट प्रभाग समिती विरोधी भाजप - ताराराणी आघाडीला यावेळी गमवावी लागली. निवडणुकीत प्रतीक्षा पाटील, छाया पोवार, सुरेखा शहा (काँग्रेस) व अफजल पिरजादे (राष्ट्रवादी) बहुमताने विजयी झाले. शहा वगळता अन्य तिघांना सलग तिसऱ्या वर्षी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महानगरपालिका प्रभाग समिती सभापतींची निवडणूक जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याकरिता सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून चारही प्रभाग समितीच्या विशेष सभा घेण्यात आल्या. प्रभाग समिती सभापतींसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप- ताराराणी आघाडी अशी सरळ लढत हे स्पष्ट झाले होते. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, बागल मार्केट प्रभाग समितीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. ताराराणी मार्केट प्रभाग समितींवर सत्तारूढ व विरोधी आघाडीचे समान १०-१० असे संख्याबळ होते. त्यामुळे या प्रभाग समितीवर सभापती म्हणून कोणाची वर्णी लागणार हा उत्सुकतेचा विषय होता. कारण ताराराणी आघाडीचे उमेदवार राजसिंह शेळके यांच्या (पान ६ वर) इंगवले अनुपस्थितगांधी मैदान प्रभाग समिती सभापती निवडणुकीवेळी ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले या अनुपस्थित होत्या. चारही सभापतींच्या निवडी शांततेत पार पडल्या. गांधी मैदान प्रभाग समिती - १) प्रतीक्षा धीरज पाटील (कॉँग्रेस) - १३ मते २) संतोष बाळासो गायकवाड (भाजप) - ६ मतेशिवाजी मार्केट प्रभाग समिती - १) अफजल कुतबुद्दीन पिरजादे (राष्ट्रवादी) - १२ मते २) सुनंदा सुनील मोहिते (भाजप) - ८ मतेबागल मार्केट प्रभाग समिती- १) छाया उमेश पोवार (कॉँग्रेस) - १२ मते२) कमलाकर यशवंत भोपळे (ताराराणी) - ८ मतेताराराणी मार्केट प्रभाग समिती - १) सुरेखा प्रेमचंद शहा (काँग्रेस) - १० मते २) राजसिंह भगवानराव शेळके (ताराराणी) - ९ मते
चारही प्रभाग समित्यांवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा
By admin | Published: April 25, 2017 12:05 AM