कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापतिपदी सर्वपक्षीय उमेदवार विजयी झाले असून, कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी; तर युवक क्रांती आघाडी, जनसुराज्य आणि स्थानिक शाहू आघाडीला प्रत्येकी एका ठिकाणी सभापती बनविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांत प्रचंड राजकीय उलथापालथी होत जिल्ह्यातील राजकारणामध्ये काहीही होऊ शकते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. एकीकडे भाजप राष्ट्रवादीमध्ये जिल्ह्यात उभा दावा असताना गडहिंग्लज येथील सभापती निवडीत चक्क भाजपने राष्ट्रवादीशी युती करीत सर्वांनाच धक्का दिला आहे. येथे राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सदस्य आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली. दुसरीकडे भाजप, स्वाभिमानी यांचा समावेश असलेली युवक क्रांती आघाडी आणि कॉँग्रेस यांनी एकत्र येऊन चंदगड येथे सत्ता स्थापन केली आहे. येथे कॉँग्रेसचे भरमूअण्णा पाटील यांनी एक पाऊल मागे घेत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आघाडीचे घटक असलेल्या भाजपचे गोपाळराव पाटील, स्वाभिमानी यांची मोट बांधून ‘स्वाभिमानी’ला सभापतिपद देऊन विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर आणि त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना धक्का दिला आहे. मूळचे स्वाभिमानीचे असलेले जगन्नाथ हुलजी हे निवडून येताना मात्र राष्ट्रवादी भाजपच्या युवक क्रांती आघाडीतून निवडून आले होते. पाच वर्षे भाजपसोबत राहायचे ठरले असतानाही आपल्या मुलाला पाडण्यात राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करीत गोपाळराव पाटील यांनी थेट भरमूअण्णांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरात सोमवारी (दि. १३) रात्री संघटनमंत्री बाबा देसाई यांनी केलेले समेटाचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले. कागलमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या कमल पाटील या सभापती, तर राष्ट्रवादीचे रमेश तोडकर बिनविरोध उपसभापती बनले. शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होऊन तेथे कॉँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले यांची सभापतिपदी व उपसभापतिपदी शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड झाली. हातकणंगलेमध्ये भाजप- ६, जनसुराज्य- ५ अशी ११ संख्या होत होती. काँग्रेसचे एकमेव सदस्य राजकुमार भोसले यांनी भाजप-जनसुराज्यसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या रेश्मा सनदी यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी जनसुराज्यच्या सुलोचना देशमुख यांची निवड करण्यात आली. पन्हाळा येथे जनसुराज्यचे पृथ्वीराज सरनोबत व उज्ज्वला पाटील यांची सभापती व उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राधानगरीचे सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीचे दिलीप कांबळे यांची येथे बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र उपसभापतिपदी मतदान होऊन येथे कॉँग्रेसचे रवीशसिंह पाटील विजयी झाले. मात्र येथे उपसभापतिपदासाठी निवडणूक होऊन कॉँग्रेसच्याच दोघांनी पाटील यांच्याविरोधात मतदान केले. करवीरच्या सभापतिपदी काँग्रेसमधील सतेज पाटील गटाचे प्रदीप झांबरे यांची, तर उपसभापतिपदी विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आजऱ्याच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या रचना होलम यांची, तर राष्ट्रवादीचेच शिरीष देसाई यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गडहिंग्लजमध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने भाजपच्या जयश्री तेली यांची सभापतिपदी, तर राष्ट्रवादीच्या बानश्री चौगुले यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे. भुदरगडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या शाहू आघाडीच्या सरिता करंडेकर व अजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंदगडमध्ये मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या असून, येथे स्वाभिमानीचे एकमेव सदस्य असलेले जगन्नाथ हुलजी हे सभापती झाले आहेत; तर भाजपचे अॅड. अनंत कांबळे उपसभापती बनले आहेत.शाहूवाडी येथे शिवसेनेच्या स्नेहा जाधव व दिलीप पाटील यांची सभापती व उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. गगनबावड्याच्या सभापतिपदी कॉँग्रेसच्या मंगल कांबळे, तर उपसभापतिपदी कॉँग्रेसचेच पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पक्षपंचायत समिती, सभापतीगतवेळचेसध्याचे बळबळकॉँंग्रेसकरवीर, गगनबावडा, शिरोळ६३राष्ट्रवादी कॉँग्रेसआजरा, राधानगरी३२भाजपगडहिंग्लज, हातकणंगले0२शिवसेनाशाहूवाडी, कागल१२जनसुराज्यपन्हाळा११युवक क्रांती आघाडीचंदगड0१स्थानिक आघाडीभुदरगड०१स्वाभिमानी पक्ष----१0एकूण१२१२केवळ ‘लोकमत’चीच चर्चाजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बदलत्या राजकारणाचे तंतोतंत भाकीत केल्याने मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात केवळ ‘लोकमत’चीच चर्चा होती. कागलमध्ये मंडलिक गटाच्या कमल पाटील याच सभापती होणार असल्याचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते; तर चंदगडच्या सभापतिपदाची लॉटरी मूळच्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला लागणार असल्याचे वृत्त केवळ आणि केवळ ‘लोकमत’मध्येच प्रसिद्ध झाले होते. तसेच जिल्हा परिषदेसाठीही शिवसेनेचा कल स्पष्टपणे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने ‘लोकमत’मधील या राजकीय बातम्यांची जिल्ह्यात चर्चा सुरू होती.
तीन ठिकाणी कॉँग्रेसचे सभापती
By admin | Published: March 15, 2017 1:09 AM