महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर काँग्रेसचे आंदोलन सुरु, वाहने विनाटोल सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:39 AM2024-08-03T11:39:57+5:302024-08-03T11:46:14+5:30

कोल्हापूर : पुणे- कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल सात तास लागत आहेत. त्यामुळे ...

Congress protest on toll road against the bad condition of Pune-Kolhapur highway | महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर काँग्रेसचे आंदोलन सुरु, वाहने विनाटोल सोडणार

महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर काँग्रेसचे आंदोलन सुरु, वाहने विनाटोल सोडणार

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल सात तास लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, या मागणीसाठी काँग्रेसने आज, या महामार्गावरील चारही टोलनाक्यांवर आंदोलन सुरु केले आहे. किणी येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रस्त्यांची दुर्दशा, मग टोल हवाच कशाला, रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त, खटक्यावर बोट टोल जाग्यावर पलटी अशा हाताचे फलक हाती घेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता.

याठिकाणी आंदोलन सुरु

- कोल्हापूर : किणी टोलनाका
- सातारा : आणेवाडी टोलनाका
- कऱ्हाड, सांगली : तासवडे टोलनाका
- पुणे : खेड शिवापूर टोलनाका

Web Title: Congress protest on toll road against the bad condition of Pune-Kolhapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.