शिरोळ : केंद्र शासनाने कृषी व शेतकरीविरोधी तीन कृषी काळे कायदे मंजूर केल्याच्या विरोधात, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय काँग्रेस समितीने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी शिरोळ तालुका काँग्रेस समिती व कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली.दिल्ली येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांना अतोनात त्रास दिला जात असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला, तर जाचक कृषी कायदे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले.यावेळी काँग्रसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, माजी पं. स. सभापती मिनाज जमादार, विजित शिंदे, सदाशिव पोपळकर, अनंत धनवडे, अमोल चौगुले, योगेश पुजारी, तातोबा पाटील, विनोद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिरोळमध्ये काँग्रेसकडून केंद्राचा निषेध, दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 6:29 PM
FarmarStrike, Congress, Kolhapurnews केंद्र शासनाने कृषी व शेतकरीविरोधी तीन कृषी काळे कायदे मंजूर केल्याच्या विरोधात, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय काँग्रेस समितीने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी शिरोळ तालुका काँग्रेस समिती व कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देशिरोळमध्ये काँग्रेसकडून केंद्राचा निषेध दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा