शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

लसीकरण केंद्रावर काँग्रेसतर्फे पिण्याच्या पाण्याची साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:17 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पाण्याचे कुलकेज जिल्हा काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.

सध्या कोविड लसीकरण मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शनिवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याला सुरुवात करण्यात आली. ही लसीकरण मोहीम पुढील सहा महिने चालणार आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामान्यांना आधार देण्याच्या भावनेतून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने लसीकरण केंद्रावर १५० पिण्याच्या पाण्याचे कुलकेज उपलब्ध करून दिले आहेत.

यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, किशोर खानविलकर, महंमद शरीफ शेख, संपत पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, मतीन शेख, सचिन काटकर, किरण मेथे, डॉ. बुलबुले, मंगल खुडे, आर. के. देवणे, यशवंत थोरवत, संजय चिकुर्डेकर, बाबुराव कंबळे, राजेंद्र मोरे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, अक्षय शेळके उपस्थित होते.

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-कॉग्रेस कमिटी

ओळ -कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून कुलकेज भेट देण्यात आले.