VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी गड राखणार?, अस्तित्वाची लढाई

By राजाराम लोंढे | Published: October 10, 2024 02:41 PM2024-10-10T14:41:42+5:302024-10-10T14:43:01+5:30

गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारण पूर्णपणे विस्कळीत

Congress, Shindesena, NCP will maintain stronghold in Kolhapur district assembly election, battle for survival | VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी गड राखणार?, अस्तित्वाची लढाई

VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी गड राखणार?, अस्तित्वाची लढाई

राजाराम लोंढे

कोल्हापूर : आगामी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर बैठका मारण्यास सुरूवात केली असली, तरी दहाही मतदारसंघांत काँग्रेस, शिंदेसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला आपापले गड अबाधित राखण्याचे आव्हान राहणार आहे. तर उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असेल.

विधानसभेचे बिगुल येत्या आठ दिवसात वाजणार आहे. सगळीकडे विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लागला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच महायुती व महाविकास आघाडी अंतर्गत वाद काही कमी होताना दिसत नाही. एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यास सुरूवात झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे दहाही मतदारसंघांत काटाजोड लढती होणार आहेत. दिग्गजांची आपले गड राखताना दमछाक होणार, हे निश्चित आहे.

काँग्रेस स्ट्राइक रेट राखणार?

विधानसभेच्या २०१४ निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. मात्र, २०१९ ला त्यांनी चार ठिकाणी यश मिळवले. आता ते दहापैकी किमान पाच जागांवर लढणार आहेत. किमान मागील निवडणुकीतील स्ट्राइक रेट राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

मागील निवडणुकीवर टाकलेला दृष्टीक्षेप

पक्ष  - २०१४  - २०१९

काँग्रेस -  ००   -  ०४
राष्ट्रवादी काँग्रेस - ०२ -  ०२
शिवसेना - ०६  -  ०१
भाजप - ०२  -  ००
जनसुराज्य - ०० - ०१
ताराराणी पक्ष - ०० - ०१
अपक्ष - ०० -  ०१

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवारनिहाय मते :

कोल्हापूर उत्तर :
चंद्रकांत जाधव : ९१,०५३
राजेश क्षीरसागर : ६९,७३६
मताधिक्य : १५,१९९

पोटनिवडणूक :
जयश्री जाधव : ९७,३३२
सत्यजीत कदम : ७८,०२५
मताधिक्य : १९,३०७

कोल्हापूर दक्षिण :
ऋतुराज पाटील : १,४०,१०३
अमल महाडिक : ९७,३९४
मताधिक्य : ४२,७०९

करवीर :
पी. एन. पाटील : १,३५,६७५
चंद्रदीप नरके : १,१३,०१४

चंदगड :
राजेश पाटील : ५५,५५८
शिवाजी पाटील : ५१,१७३
अप्पी पाटील : ४३,९७३
मताधिक्य : ४,३८५

कागल :
हसन मुश्रीफ : १,१६,४३६
समरजीत घाटगे : ८८,३०३
संजय घाटगे : ५५,६५७
मताधिक्य : २८,१३३

राधानगरी :
प्रकाश आबीटकर : १,०५,८८१
के. पी. पाटील : ८७,४५१
अरुण डोंगळे : १५,४१४
मताधिक्य : १८,४३०

शाहूवाडी :
विनय काेरे : १,२४,८६८
सत्यजीत पाटील : ९७,००५
मताधिक्य : २७,८६३

इचलकरंजी :
प्रकाश आवाडे : १,१६,८८६
सुरेश हाळवणकर : ६७,०७६
राहुल खंजिरे : ७,२६२
मताधिक्य : ४९,८१०

शिरोळ :
राजेंद्र पाटील-यड्रावकर : ९०,०३८
उल्हास पाटील : ६२,२१४
सावकर मादनाईक : ५१,८०४

हातकणंगले :
राजू आवळे : ७३,७२०
सुजित मिणचेकर : ६६,९५०
अशोकराव माने : ४४,५६५
मताधिक्य : ६६७०

Web Title: Congress, Shindesena, NCP will maintain stronghold in Kolhapur district assembly election, battle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.