राजाराम लोंढेकोल्हापूर : आगामी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर बैठका मारण्यास सुरूवात केली असली, तरी दहाही मतदारसंघांत काँग्रेस, शिंदेसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला आपापले गड अबाधित राखण्याचे आव्हान राहणार आहे. तर उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असेल.विधानसभेचे बिगुल येत्या आठ दिवसात वाजणार आहे. सगळीकडे विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लागला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच महायुती व महाविकास आघाडी अंतर्गत वाद काही कमी होताना दिसत नाही. एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यास सुरूवात झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे दहाही मतदारसंघांत काटाजोड लढती होणार आहेत. दिग्गजांची आपले गड राखताना दमछाक होणार, हे निश्चित आहे.काँग्रेस स्ट्राइक रेट राखणार?विधानसभेच्या २०१४ निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. मात्र, २०१९ ला त्यांनी चार ठिकाणी यश मिळवले. आता ते दहापैकी किमान पाच जागांवर लढणार आहेत. किमान मागील निवडणुकीतील स्ट्राइक रेट राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
मागील निवडणुकीवर टाकलेला दृष्टीक्षेपपक्ष - २०१४ - २०१९काँग्रेस - ०० - ०४राष्ट्रवादी काँग्रेस - ०२ - ०२शिवसेना - ०६ - ०१भाजप - ०२ - ००जनसुराज्य - ०० - ०१ताराराणी पक्ष - ०० - ०१अपक्ष - ०० - ०१
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवारनिहाय मते :कोल्हापूर उत्तर :चंद्रकांत जाधव : ९१,०५३राजेश क्षीरसागर : ६९,७३६मताधिक्य : १५,१९९
पोटनिवडणूक :जयश्री जाधव : ९७,३३२सत्यजीत कदम : ७८,०२५मताधिक्य : १९,३०७
कोल्हापूर दक्षिण :ऋतुराज पाटील : १,४०,१०३अमल महाडिक : ९७,३९४मताधिक्य : ४२,७०९
करवीर :पी. एन. पाटील : १,३५,६७५चंद्रदीप नरके : १,१३,०१४
चंदगड :राजेश पाटील : ५५,५५८शिवाजी पाटील : ५१,१७३अप्पी पाटील : ४३,९७३मताधिक्य : ४,३८५
कागल :हसन मुश्रीफ : १,१६,४३६समरजीत घाटगे : ८८,३०३संजय घाटगे : ५५,६५७मताधिक्य : २८,१३३
राधानगरी :प्रकाश आबीटकर : १,०५,८८१के. पी. पाटील : ८७,४५१अरुण डोंगळे : १५,४१४मताधिक्य : १८,४३०
शाहूवाडी :विनय काेरे : १,२४,८६८सत्यजीत पाटील : ९७,००५मताधिक्य : २७,८६३
इचलकरंजी :प्रकाश आवाडे : १,१६,८८६सुरेश हाळवणकर : ६७,०७६राहुल खंजिरे : ७,२६२मताधिक्य : ४९,८१०
शिरोळ :राजेंद्र पाटील-यड्रावकर : ९०,०३८उल्हास पाटील : ६२,२१४सावकर मादनाईक : ५१,८०४
हातकणंगले :राजू आवळे : ७३,७२०सुजित मिणचेकर : ६६,९५०अशोकराव माने : ४४,५६५मताधिक्य : ६६७०