शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केलाय, नाना पटोलेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:15 PM

कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज, शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेवेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.केंद्र सरकार आरक्षण मोडीत काढत असून हे देशाला घातक आहे. कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.पटोले म्हणाले, भाजपला देशात समान नागरी कायदा आणण्याचा आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत असून राजर्षी शाहू महाराजांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्य माणसांमध्ये केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात चीड आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा डाव सामान्य माणसाने ओळखला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव या मोठ्या फरकाने विजयी होतील आणि कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आदी उपस्थित हाेते.शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊशाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. भविष्यात ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोळी भाजू नकाज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला भ्याड असून एसटी कर्मचारी असे करणार नाहीत. त्यांना फूस लावणारी शक्ती वेगळी असून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजण्याचा उद्योग करू नये, असे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले