शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

हातकणंगलेत काँग्रेस, स्वाभिमानी संघटना एकत्र

By admin | Published: February 07, 2017 12:32 AM

तिरंगी काटालढत : भाजप आघाडीतील जनसुराज्यमध्ये प्रचंड नाराजी; शिवसेनेकडून मतदारसंघाबाहेरील उमेदवार

दत्ता बिडकर -- हातकणंले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस, भाजप आघाडी आणि शिवसेनेत तिरंगी काटा लढत होत आहे. काँग्रेसने स्वाभिमानीला एक पंचायत समिती देऊन भाजप आघाडीमध्ये बिघाडी केली आहे, तर भाजप आघाडीतील जनसुराज्यमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने उचला उमेदवार देऊन निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला आहे. मतदारसंघ ओबीसी पुरुषासाठी आरक्षित झाल्यापासून इच्छुक कामाला लागले होते. मात्र, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी कुणबी जातीचा दाखला काढून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून या मतदारसंघात वेगळी चर्चा सुरू झाली. अरुण इंगवले यांच्या भाजप प्रवेशाने या मतदारसंघातील राष्ट्रवादी संपली आणि पालकंमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी तालुक्यातून राष्ट्रवादी संपविण्यासाठीच आघाड्या करून निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुक्यात भाजप, जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीच्या जोडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी होऊन काँग्रेस आणि शिवसेना यांना शह बसेल अशी शक्यता होती. मात्र, भाजप आघाडीतून स्वाभिमानी बाहेर पडल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर करून ‘एकला चलो’चा नारा दिला आहे, तर काँग्रेसच्या आवळे आणि आवाडे यांच्या प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या भूमिकांमुळे तालुक्यात कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे.काँग्रेसने स्वाभिमानीबरोबर समझोता केला आहे. या जि. प. मतदारसंघात स्वाभिमानीने हातकणंगले पं. स.साठी आळतेचे प्रवीण जनगोडा या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. जि. प.ला स्वाभिमानीने उमेदवार दिला नसल्याने या मतदारसंघात स्वाभिमानीने काँग्रेसला बाय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने या मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी संदीप कारंडेंना उमेदवारी देऊन धनगर समाजाला न्याय दिला आहे. सावर्डे पंचायत समितीसाठी काँग्रेसने नरंदेचे माजी सरपंच आणि महादेवराव महाडिक यांचे समर्थक संजीवनी नॉलेज सिटीचे पी. आर. भोसले यांचे बंधू राजकुमार भोसले यांना उमेदवारी देऊन महादेवराव महाडिकांवर कुरघोडी केली आहे.हातकणंगले मतदारसंघात अरुण इंगवले म्हणजे पक्ष अशी स्थिती आहे. आता ते म्हणजे भाजप अशी स्थिती आहे. इंगवले यांना भाजप, जनसुराज्य आणि ताराराणीकडून उमेदवारी मिळाली आहे, तर हातकणंगले आणि सावर्डे या दोन पंचायत समिती जनसुराज्यला देण्यात आल्या आहेत. फायदा आणि तोटा निवडणुकीनंतरअरुण इंगवले यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रामुळे या मतदारसंघात सर्वसाधारण खुल्या जागेवर तेच आणि ओबीसी आरक्षण जागेवरही तेच यामुळे बारा बलुतेदार, साळी, माळी, लोहार सुतार, धनगर, तेली, कोळी यासह मुस्लिमसह इतर ओबीसीमध्ये नाराजी असून, या नाराजीचा फायदा आणि तोटा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.घड्याळ चिन्ह पहिल्यांदा गायबहातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह पहिल्यांदा गायब झाले आहे. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे सावर्डे येथील भोसले घराणे आणि नरंदे व सावर्डे परिसरात शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा राष्ट्रवादी गट या निवडणुकीत काय भूमिका घेणार हेही या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.