जिल्हाभरातील काँग्रेस उतरली रस्त्यावर: प्रत्येक तालुक्यातही आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 07:13 PM2021-03-26T19:13:29+5:302021-03-26T19:15:18+5:30
Congress Kolhapur- केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपोषण सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची रीघ लागली होती, यानिमित्त का असेना, पण बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचे पाय काँग्रेस कमिटीला लागले.
कोल्हापूर : केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपोषण सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची रीघ लागली होती, यानिमित्त का असेना, पण बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचे पाय काँग्रेस कमिटीला लागले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी भारत बंद आंदोलन झाले. काँग्रेस यात ताकदीने उतरेल, असे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहीर केल्यानुसार राज्यभरातही आक्रमकपणे एक दिवसाचे उपोषण करा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. जिल्हा मुख्यालय व तालुका कार्यालयातही जोरदारपणे आंदोलन करण्याचे आदेश शिरसावंद्य मानून कोल्हापुरातील आंदोलनाला बऱ्याच वर्षांनी बहुतांश काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरवत हजेरी लावली. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत शहर व करवीर तालुका तर इतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आजी- माजी आमदारांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
कोल्हापुरातील आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पक्षनिरीक्षक म्हणून आ. शिरीष चौधरी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आ. जयंत आसगावकर, गोपाळराव पाटील, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, दिलीप पाटील, सुरेश कुऱ्हाणे, संध्या घोटणे यांच्यासह काँग्रेस, नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते.